जैन इरिगेशनच्या तंत्र ज्ञानाची राजस्थानला जोड मिळावी

राजस्थानमध्ये जमीन व पाण्याची मुबलकता आहे त्याला जैन इरिगेशनच्या उच्च तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होऊन त्यांचे उत्पन्नात वाढ करण्याची खूप मोलाची गोष्ट होऊ शकते…

जैन इरिगेशनच्या तंत्र ज्ञानाची राजस्थानला जोड मिळावी

जैन इरिगेशनच्या तंत्र ज्ञानाची राजस्थानला जोड मिळावी 

राजस्थानचे कृषीमंत्री लालचंद कटारिया यांनी व्यक्त केली इच्छा  

 जळगाव, (प्रतिनिधी) - “राजस्थानमध्ये जमीन व पाण्याची मुबलकता आहे त्याला जैन इरिगेशनच्या उच्च तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होऊन त्यांचे उत्पन्नात वाढ करण्याची खूप मोलाची गोष्ट होऊ शकते…” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया राजस्थानचे कृषी, पशुसंवर्धन व मत्स्यपालन मंत्री लालचंद कटारिया यांनी दिली.

राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी, कृषीमंत्री लालचंद कटारिया, सहकार मंत्री उदयलाल आंजना, राज्यमंत्री राज्य मंत्री राजेंद्रसिंह यादव, राजाखेड़ाचे आमदार रोहित बोहरा आणि राजस्थानचे प्रशासकीय अधिकारी यांनी जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांना भेट दिली. मान्यवर अतिथींचे जैन हिल्स येथे कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी स्वागत केले. राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी व कृषीमंत्री कटारिया, सहकार मंत्री आंजना, राज्य मंत्री यादव या मान्यवरांनी जैन उच्च कृषी तंत्रज्ञान व शेती संशोधन, विकास प्रकल्पाच्या फ्युचर फार्मिंगचे अवलोकन केले. या सर्व प्रयोग, प्रकल्पांची अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन यांच्यासह डॉ. बी. के. यादव, के.बी. पाटील यांनी माहिती करून दिली.

कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना सल्ला

राजस्थानचे बसवाडा येथील सुमारे ५० शेतकरी जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानाची माहिती व प्रयोगांना भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यावेळी योगायोग कृषिमंत्री कटारिया यांची त्यांच्याशी भेट झाली. जैन इरिगेशनचे उत्तम शाश्वत शेतीचे तंत्रज्ञान येथून शिकून घ्या. कमी पाण्यात शेती करण्यासाठी येथील ठिबक सिंचनाचा अवलंब कराअसा सल्ला त्यांनी सुसंवाद साधताना शेतकऱ्यांना दिला.